रत्नागिरीत 3 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, तीन आरोपी ताब्यात

रत्नागिरी एमआयडीसी परिसरात व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून 3 कोटी 10 लाख 30 हजार रुपये किंमतीची 3 किलो 4 ग्रॅम वजनाची उलटी जप्त केली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून छापा टाकला. पोलिसांनी रोहित रमेश चव्हाण,आसिफ अस्लम मोरस्कर  आणि तेजस परशुराम कांबळे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 3 कोटी 10 लाख 30 हजार रुपये किंमतीची व्हेल माशांची उलटी सापडली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे,उपनिरीक्षक प्रशांत बोरकर,बाळू पालकर,गणेश सावंत,प्रवीण खांबे,सत्यजीत दरेकर आणि अतुल कांबळे यांनी केली.