
मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या गस्तीनौकेकडे डिझेल नसल्याने एलईडी दिवे लावून बिनधास्त समुद्रात मासेमारी सुरू होती.हिच संधी ओळखून मत्स्यव्यवसाय विभागाने तात्काळ डिझेल उपलब्ध करून सोमवारी मध्यरात्री थरारक पाठलाग करून एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या तीन नौका जयगड येथे पकडल्या आहेत.
कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाने एक पथक तयार केले त्यामध्ये परवाना अधिकारी चिन्मय जोशी,पार्थ तावडे,स्वप्नील चव्हाण,दिप्ती साळवी,स्मितल कांबळे,सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर,विनायक शिंदे,सृजन पवार आणि साईनाथ साळवी यांचा समावेश होता.
सोमवारी मध्यरात्री एलईडी दिवे लावून मासेमारी सुरू असताना मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने अचानक धाड टाकली.त्याचक्षणी मासेमारी करणाऱ्या नौकांवर समुद्रातून पळ काढला.सुमारे एक तास थरारक पाठलाग करत गस्ती नौकेने तीन नौका पकडल्या.त्यामध्ये इम्तियाज हाजी आणि हसनमियॉ मुकादम यांची आयएनडी-एमएच ४- एमएम १९६१ हि एच. इम्तियाज नौका,लीना लक्ष्मण बिर्जे यांची आयएनडी-एमएच ४- एमएम ५०६ लक्ष्मी हि नौका, अब्दुल लतीफ अली होडेकर यांची आयएनडी-एमएच ४- एमएम १९७१ हि अक्सा इम्रान नौकेचा समावेश आहे.पकडलेल्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय साहाय्य आयुक्त कार्यालयाने सांगितले आहे.



























































