जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणणार

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 197 शिक्षकांच्याघाईघाईने आंतरजिल्हा बदली केल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. सर्व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त केली आणि अखेर त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या बाबतची नोटीस जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना देऊन अविश्वास ठराव आणला जाईल असे शिवसेना उपनेते, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरी जि.प़ तील 197 शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यामुळे जिल्ह्यात सुमारे साडेसहाशे शिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे शिक्षण यंत्रणेवर प्रचंड ताण पडणार असून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरणामुळे जि.प.तील सर्व सदस्य आणि पदाधिकारी संतप्त झाले आणि त्याचे पडसाद आज उमटले. पदाधिकारी आणि सदस्यांच्या बैठकीनंतर शिवसेना उपनेते, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत जि.प मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. सभागृहाला एखादा अधिकारी जर विकास कामामध्ये सहकार्य करत नसेल किंवा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करत नसेल तर सर्वसाधारण सभेला त्या अधिकार्‍यांला परत बोलावण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर अविश्वास ठराव आणण्यात येणार असून त्याबाबतची नोटीस लवकंरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येईल असे उदय सामंत यांनी सांगितले. उद्या मी मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बोलणार असून त्यांना सर्व परिस्थिती सांगणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.

अनेकं कामामध्ये असहकार्य – स्वरुपा साळवी

जि.पअध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी सांगितले की, मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले होते की जिल्ह्यात शिक्षकांची कंमी आहे़ त्यामुळे आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांना सोडू नका मात्र त्यांनी ते न ऐकता घाईघाईने त्यांच्या ऑनलाईन बदल्याही केल्या. ही एवढी घाई कशसाठी केली. ग्रामसेवकांच्या त्यांनी आडमुठेपणाचे धोरण घेतले होते. त्यावेळी त्यांना ग्रामसेवकांना गृहीत धरु नका असे सांगितले होते. वारंवार आम्ही याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचनाही केल्या होत्या. कारण हे जे जि.प़ सदस्य आहेत ते लोकांमधून निवडून येतात. त्यांच्या मागण्यांचा विचार करा. मात्र जि.प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकंडून कोणताही सहकार्य होत नसल्यामुळे आम्हाला अविश्वासाच्या ठरावापर्यंत यावे लागले असे जि.प़.अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी सांगितले. शिवसेनेचे गटनेते उदय बने यांनी जि.प. च्या सर्वसाधारण सभेतच आम्ही त्यांना या सर्व प्रकंरणाबाबतची पूर्वकल्पना दिली होती़ पण तरीही त्यांनी आंतरजिल्हा बदली करून आज शैक्षणिक समस्या जिल्ह्यात निर्माण केली. शासन निर्णयाप्रमाणे ते जर चालत असतील तर मग राजापूर तालुक्यात 23 शाळा विनाशिक्षकी शाळा का झाल्या? ही जबाबदारी कोणाची असा सवालही उदय बने यांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, बांधकाम सभापती विनोद झगडे, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, शिक्षणसभापती सहदेव बेटकर, महिला बालकल्याण सभापती साधना साळवी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या