
आपला जोडीदार : रत्नाकर मतकरी
लग्नाचा वाढदिवस : 1962मध्ये दसऱयाला लग्न झाले, पण नेमकी तारीख आठवत नाही.
आठवणीतला क्षण : माझ्यासाठी आमचा प्रत्येक क्षण हा खासच आहे.
त्यांचे दोन शब्दात कौतुक : अलौकीक बुद्धिमत्ता असलेले, शिस्तप्रिय.
त्यांचा आवडता पदार्थ : त्यांना मांसाहार अतिशय आवडतो. त्यात विशेष म्हणजे मासे.
एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ : त्यांना काहीच करता येत नाही, अगदी चहासुद्धा.
वैतागतात तेव्हा : ते चिडले की मी आणखी चिडते. जास्त मीच चिडचिड करत असते. पण ते कधी चिडले तर शांत राहते.
त्यांच्यातली कला : त्यांच्यात अनेक कला आहेत. चित्र खूप सुंदर काढतात. संगीताची आहे. सर्व लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची कला आहे.
त्यांची गंमत करायची असल्यास : ते काही गंमत वगैरे करुन घेणाऱयातले नाहीत. गंमत वगैरे करत नाही.
त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ : जा सांग लक्ष्मणा, सांग रामराजाला.
तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान : प्रथम क्रमांकावर.
भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल : नाटकाच्या संबधी असलेले सगळे दिवस.
तुमच्यातील सारखेपणा : खरं तर आमचे स्वभाव विरुद्ध आहेत, सारखेपणा नाही आहे. पण नाटकाची आवड दोघांनाही आहे. त्यांच्यात कला आहे आणि मला कलेची आवड आहे.
तुम्हाला जोडणारा भावबंध : मुलं आणि लेखन
कठीण प्रसंगात त्यांची साथ : कायम असते.
विश्वास म्हणजे : दुसऱयावर पूर्णपणे भरोसा वाटणे, कुठल्याही परिस्थितीत आपल्यासोबत असेल असे वाटणे.
आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट : आम्ही आतापर्यंत जे केलं ते सगळंच एकमेकांना माहीत आहे. तो कलाकार म्हणून खूपच मोठा आहे असं मला वाटतं. त्याच्यातील कलागुण कायम राहू दे शेवटापर्यंत. त्याला कायम असं वाटत राहतं की ज्या क्षणी मी काही करत नसतो, ज्याक्षणी क्रिएटिव्ह काही करत नसतो तेव्हा मी नसतोच. त्यामुळे त्याची क्रिएटिव्हीटी अशीच कायम राहावी.































































