पुजारी टोळीचा रेकॉर्डवरचा पंटर शस्त्रांसह रंगेहाथ सापडला

रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीच्या सक्रिय पंटरला खंडणीविरोधी पथकाने शस्त्रांसह रंगेहाथ पकडले. त्याच्या अंगझडतीत दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि 15 जिवंत काडतुसे सापडली.

पुजारी टोळीचा सक्रिय हस्तक शस्त्रs घेऊन कॉटनग्रीन परिसरात येणार असल्याची खबर खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुनील पवार, अरुण थोरात व पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार एक इसम तेथे दुचाकीवरून येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असता दोन पिस्तुले आणि 15 जिवंत काडतुसे सापडली. सादिक बंगाली असे त्याचे नाव असून तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. बंगालीविरोधात मुंबई, नवी मुंबई व पुणे येथे गंभीर स्वरूपाच्या 15 गुह्यांची नोंद आहे. त्याने ही शस्त्रs कशासाठी बाळगली होती याचा पोलीस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या