
कानपूर कसोटीमध्ये हातातोंडाशी आलेला सामना अनिर्णित राहिला असला तरी हिंदुस्थानचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन याने एक विक्रम केला आहे. अश्विन याने कसोटी क्रिकेटमध्ये हरभजन सिंग याचा 417 बळींचा विक्रम मागे टाकला आहे. आता त्याची नजर दिग्गज खेळाडू कपिल देव यांच्या विक्रमावर आहे.
चौथ्या दिवशी आर. अश्विन याने न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज विल यंग याची विकेट घेत हरभजन सिंग याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. पाचव्या दिवशी त्याने यष्टीरक्षक फलंदाज टॉम ब्लेंडल याचा त्रिफळा उडवत भज्जीचा विक्रम मोडला. यासह कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्याच्या यादीत अश्विनने तिसरे स्थान पटकावले आहे.
हरभजन सिंग याने हिंदुस्थानकडून 103 कसोटी सामने खेळले. यात त्याने 417 बळी मिळवले होते. तर आर. अश्विन याने 80 व्या कसोटीत त्याचा हा विक्रम मोडला. अश्विनच्या नावावर आता 418 बळींची नोंद झाली आहे. अश्विनच्या पुढे अनिल कुंबळे आणि कपिल देव आहेत. येत्या काळात कपिल देव यांचा 434 बळींचा विक्रम मोडण्याचीही संधी अश्विनकडे आहे.
INDvsNZ न्यूझीलंडने कानपूर कसोटी वाचवली, रचिनच्या चिवट खेळामुळे सामना अनिर्णित
सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर. अश्विनने 13 व्या स्थानी झेप घेतली आहे. मुथय्या मुरलीधरन 800 बळींसह पहिल्या स्थानावर आहे. तसेच सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये अश्विनचा तिसरा क्रमांक लागलो. पहिल्या स्थानावर 632 बळींसह जेन्स अँडरसन आणि दुसऱ्या स्थानावर 524 बळींसह स्टुअर्ट ब्रॉड विराजमान आहे.
हरभजनने केलं अभिनंदन
दरम्यान, आर. अश्विन याने आपला विक्रम मोडतात हरभजन सिंग याने त्याचे अभिनंदन केले. माझ्या पुढे जाण्याबद्दल आणि हिंदुस्थानकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्यात तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल अभिनंदन, असे ट्वीट हरभजन सिंग याने केले.
Reaction of @harbhajan_singh to @PTI_News “Congratulations to @ashwinravi99 on his milestone. Wish he wins many more matches for the country.”
“Never believed in comparisons. I did my best for the country during my time and Ashwin has done his best during his.”#IndianCricketTeam— Kushan Sarkar (@kushansarkar) November 29, 2021





























































