
नवरात्र आणि येऊ घातलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, आरबीआय पुन्हा व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 4 ऑक्टोबरला होणाऱया पाचव्या द्विमासिक पत धोरणावेळी याची घोषणा होऊ शकते. गेल्या सलग चार पत धोरणात आरबीआयने व्याजदर कमी केले आहेत. त्याचा फायदा गृह आणि वाहनकर्जधारकांना झाला होता.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थखात्याने कॉर्पोरेट कर कमी केल्यामुळे देशभरातील उद्योग क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. शेअर बाजारातही देशी कंपन्यांच्या समभागांमध्ये 3 हजार 200 अंकांची वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, आता आरबीआय पाचव्यांदा काही महत्त्वाचे व्याजदर कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

























































