
शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठत ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्यानंतर देशभरात कौतुक झालेल्या डिसले गुरुजींच्या अडचणीत काढ होताना दिसत आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्ताक तयार केला आहे. या प्रस्तावाची फेरपडताळणी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीने आपले काम सुरूही केले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेची प्रतिष्ठत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 7 कोटी रुपयांची ही स्कॉलरशिप आहे. ही स्कॉलरशिप मिळताच डिसले गुरुजींचे महाराष्ट्रासह देशभरात कौतुक करण्यात आले. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरू झाली. डिसले यांनी ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज करताना कोणत्याही अधिकाऱयांची परकानगीच घेतली नव्हती, असा आरोपच शिक्षण अधिकाऱयांकडून करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असूनही राज्य सरकारच्या कोणत्याही विभागाला याबाबत माहिती नसल्याचे आरटीआयमधून समोर आले. आता याच तक्रारींची पडताळणी नकनियुक्त समिती करणार आहे.
सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक असताना डिसले यांना तंत्रस्नेही विशेष शिक्षक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते; परंतु तेथे ते सलग तीन वर्षे गैरहजर राहिले, हा डिसले गुरुजींवर लागलेला सर्वात गंभीर आरोप आहे. तसा अहवालदेखील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला होता. विशेष म्हणजे 3 कर्षे गैरहजर असूनही डिसले यांनी पगार घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी परितेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कदम यांना नोटीस बजावून डिसले यांचा पगार कसा वाढण्यात आला, अशी विचारणा केली आहे. तसेच या काळात घेतलेले वेतन त्यांच्याकडून वसूल करून घ्यावे, असा मुद्दादेखील प्रस्तावात आहे. यावर ही समिती निर्णय घेणार आहे.
डिसले गुरुजींवर लागलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागातील पाच कर्मचाऱयांची स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. समितीने फेरपडताळणी सुरू केली. सर्व माहितीची पडताळणी करून लवकरच शिक्षणाधिकाऱयांकडे अहवाल सादर करण्यात येईल.
– संजय जावेर, उपशिक्षणाधिकारी.


























































