
Realme 8i आणि Realme 8s 5G हे दोन फोन 9 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहेत. एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये हे फोन लॉन्च होणार असून फोनमध्ये 5G, मिडियाटेक प्रोसेसर आणि 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
Realme 8i मध्ये हिलिया जी 96 प्रोसेसर असणार आहे. फोनमध्ये 4 GBचा रॅम आणि 128 GBची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5 हजार MAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Realme 8s 5G मध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 आणि GB रॅमचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5GBचा व्हर्च्युअल रॅमही देण्यात आला आहे. Realme 8s 5G फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 128 GB आणि 256 इंटर्नल मेमरीचा पर्याय देण्यात आला आहे. फोनमध्ये 5 हजार MAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून 33 वॅट फास्ट चार्जर देण्यात येणार आहे.

































































