चमचमीत रेसिपी

3067

ठेचा चिकन

thecha-chicken-1

साहित्य – अर्धा किलो चिकनचे तुकडे , 4 चमचे हिरवी मिरची, 4 चमचे लसूण, 4 चमचे आलं, 1 वाटी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, 1 चमचा जीरे , अर्धी वाटी शेंगदाणे तेल.

कृती – चिकनच्या तुकडय़ांना मीठ चोळून ठेवा. तोपर्यंत आलं-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबीर, जीरं जाडसर एकत्र वाटून ते मिश्रण चिकनला चोळून अर्धा-पाऊण तास मॅरीनेट करून ठेवा. सर्व्ह करते वेळी शेंगदाणे तेलात शॅलोफ्राय करा. अंगच्याच पाण्याने शिजवून घ्या. हा पदार्थ कोरडाच जास्त छान लागतो.

……………………………………………………………………………………………

तळलेलं पापलेट

pomfrey-fry-new

साहित्य – 7-8 पापलेट तुकडे (मधल्या भागातले) , 1 चमचा चिंचेचा कोळ, मीठ, तिखट चवीनुसार, हळद पाव चमचा, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धी वाटी तांदळाचे किंवा ज्वारीचे पीठ, पाव वाटी खोबरेल तेल.

कृती – पापलेटचे तुकडे स्वच्छ धुऊन त्याला थोडं मीठ लावावं. चिंचेचा कोळ, हळद, तिखट, मालवणी मसाला एकत्र करून ते वाटण तुकडय़ांना लावून अर्धा-पाऊण तास मुरल्यानंतर एकेक तुकडा तांदळाच्या (नसल्यास ज्वारीच्या) पिठात घोळवून जरा चेपावा. जास्तीचं पीठ झटकून टाकावं. खोलगट लोखंडी तव्यावर तेल घालून त्यात माशांचे तुकडे मांडावे, दोन्ही बाजूनं खरपूस तळावे.

………………………………………………………………………………………………………..

सावजी फणस 

fanas-bhaji-1

साहित्य – 300 ग्रॅम फणस , पाव चमचा मीठ, 1 लिंबू , पाव चमचा हळद, 2 चमचे आलं-लसूण, पाव वाटी कॉर्नस्टार्च, पाव वाटी तांदळाची पिठी, 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा धणे पूड, 1 चमचा जीरे पूड, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा सौप पावडर, हळद, तिखट चवीनुसार, जीरे 1 चमचा, हिरवी मिरची 2-3, लसूण 1 चमचा, 1 चमचा खसखस, अर्धी वाटी कांदा.

कृती – 300 ग्रॅम फणसाला मीठ, लिंबू, हळद व आलं-लसूण पेस्ट चोळून ठेवा. नंतर कॉर्नस्टार्च व तांदळाच्या पिठात घोळवून फणसाचे तुकडे तळून ठेवा. 2 चमचे काळा मसाला, एक चमचा धने पूड, 1 चमचा जीरे पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा सौप पावडर, एक चमचा तिखट, पाव चमचा हळद एकत्र करून भाजून घ्या व मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून याची पेस्ट तयार करा. एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यावर जीरे, हिरवी मिरची, लसूण, 1 चमचा खसखस, अर्धी वाटी लांब चिरलेला कांदा परतून फणसाचे तुकडे घाला. सर्वात शेवटी तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट व जरुरीपुरते पाणी घालून गरमा गरम सर्व्ह करा.

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या