चमचमीत रेसिपी – ‘फिश फिंगर्स’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

pratik-poyrekar-chefचिकन मटन नंतर आता शेफ प्रतीक पोयरेकर यांनी माशांच्या स्टार्टरचा एक प्रकार आज दिला आहे. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या पापलेट, सुरमई, कुपा किंवा बासा अशा माशांचा वापर करून आपण फिश फिंगर्स ही अप्रतिम डिश तयार करू शकतो

 

साहित्य

  • आवडीनुसार घेतलेल्या माशाची स्किन काढून त्याचे बोटासारखे लांब तुकडे करून घ्या (खाली फोटो दिले आहेत)
  • आलं लसून पेस्ट
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • एक ते दोन बारीक चिरलेल्या मिरच्या
  • चवीनुसार मीरपूड
  • चवीनुसार मीठ
  • 1 लहान चमचा सोया सॉस
  • 1 लहान चमचा चिली सॉस
  • 1 अंडे
  • कोटिंगसाठी तीळ आणि पोहे
  • तळण्यासाठी तेल

कृती

1. एका वाडग्यात माशांचे तुकडे घ्या. त्यात आलं लसून पेस्ट, चिरलेली मिरची, मीठ, मीरपुड, चिरलेली कोथिंबीर, सोया सॉस आणि चिली सॉस घालून मिक्स करावे.finger-cut

2. ते मिश्रण तासभर मॅरिनेट करायला ठेवावे. जेणेकरून मिश्रणाची चव माश्यांना येईल.

3. नंतर तीळ आणि पोहे मिक्सरमध्ये हलके बारीक करून घ्या.

4. नंतर मॅरीनेट केलेले मासे अंड्यात घोळवून ते बारीक केलेल्या तीळ आणि पोह्यात कोट करुन घ्या.

5. ते फिश फिंगर्स गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत खरपूस तळुन घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.