चमचमीत हैदराबादी मटण बिर्याणी

308

साहित्य – बासमती तांदूळ अर्धा किलो, कोवळे मटण 1 किलो, दही 1 वाटी, आलं-लसूण पेस्ट 3 चमचे, कांदे उभे पातळ चिरलेले 5 नग, काजू 12 नग, लाल सुक्या मिरच्या (भिजवून वाटलेल्या) 5-6, बडीशेप पाव चमचा, मीठ चवीनुसार.

कृती – प्रथम मटण स्वच्छ धुऊन दही, आलं, लसूण थोडे मीठ लावून 2 तास ठेवा. भरपूर तूपात पातळ चिरलेले कांदे तळून घ्या. तळलेला कांदा पाव भाग काढून ठेवा. उरलेल्या तुपात काजू व मिरचीची पेस्ट परता. मग मटण व पाव चमचा बडीशेप घालून चांगले परता. मीठ व सव्वा वाटी पाणी घालून शिजवा.

भात – थोडय़ा तुपात 5 हिरवे वेलदोडे, 5 लवंग व थोडी जायपत्री व धुतलेले तांदूळ घाला. मीठ व पाणी घालून अर्धाकच्चा भात तयार करून थंड करा. काढून ठेवलेला कांदा, कोथिंबीर व थोडा पुदिना चिरून एकत्र करा. मटण, भात, कांदा पुन्हा मटण असे थर द्या. शेवटी पाऊण कप दुधात केशर अथवा केशरी रंग घाला. त्यातच 1 थेंब केवडा इसेन्स घालून शिंपडा. झाकणाच्या बाजूने कणिक लावून बंद करा. गॅसवर 7-8 मिनिटे गरम करा. रायत्याबरोबर सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या