भरलेला बांगडा

235

साहित्य – मध्यम आकाराचे बांगडे 6, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार, लसूण पाकळय़ा 8-10, सुक्या मिरच्या 8-10, मालवणी मसाला अर्धा चमचा, कोथिंबीर अर्धी वाटी, आमसुल 3-4, ओलं खोबरं 1 वाटी, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, तेल तळण्यासाठी.

कृती – बांगडे साफ करून फक्त डोक्याचा भाग काढावा. दोन्ही बाजूनं प्रत्येकी 3-4 चिरा देऊन धुवावे. हळद-मीठ लावून ठेवावे. लसूण, कोथिंबीर, आमसुल, मिरच्या, खोबरं, मीठ, मसाला एकत्र करून जाडसर वाटावं. ती चटणी बांगडय़ाच्या चिरामध्ये पोटाच्या बाजूनं आत भरावी. थोडी चटणी वरूनही लावावी. नंतर ते बांगडे तांदळाच्या पिठात घोळवून, खोलगट तव्यावर कडेनं तेल सोडून तळावे.

आपली प्रतिक्रिया द्या