Recipe : साबुदाण्याचे धपाटे

2522

>> शेफ प्रतीक पोयरेकर

साहित्य
धपाटे बनवण्यासाठी
1 वाटी साबुदाणा, 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी उकडलेल्या बटाट्याचा किस, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी बारीक चिरलेले कांदे, 1 लहान चमचा ओवा, 1 लहान चमचा तीळ, 1 लहान चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 लहान चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 लहान चमचा लाल तिखट, 1 लहान चमचा हळद, 2 लहान चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर,अर्धा कप दही, लोणी किंवा बटर, चवीनुसार मीठ

चटणी बनवण्यासाठी
1 वाटी खोबऱ्याचा किस, दोन ते तीन पाकळ्या लसूण, 3 लाल मिरच्या, 1/2 चमचा जीरा पावडर, चवीनुसार मीठ

कृती-
– प्रथम साबूदाणे भिजवून घ्या. नीट भिजल्यानंतर ते पाण्यातून काढून घ्या, जेणेकरून ते जास्त गाळ होणार नाहीत.
– नंतर ज्वारीचे पीठ, बटाट्याचा कीस आणि बेसन एकत्र करून मिक्स करा.
– त्यात बारीक चिरलेला कांदा, लसुन, मिरची, हळद, लाल तिखट, ओवा, तीळ आणि कोथिंबीर मिक्स करून घ्या आणि मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
– त्यात हळद व भिजलेले साबूदाणे, मीठ टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्या.

– पीठाचे एकसमान गोळे तयार करून घ्या व त्याच्या पोळ्या लाटा. लाटताना गोळा पोळपाटाला चिकटू नये म्हणून ज्वारीचे पीठ वापरू शकता.
– तव्यावर तूप किंवा बटर टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. तुमचे धपाटे तयार आहेत.

चटणीसाठी
– मिक्सरमध्ये लाल मिरच्या, खोबऱ्याचा किस, जीरे, लसूण आणि मीठ टाकून वाटून घ्या.
– गरमागरम धापटे दही, लोणचे आणि चटणीसोबत सर्व्ह करा

 

आपली प्रतिक्रिया द्या