
सामना ऑनलाईन, मथुरा
मथुरेमध्ये माकडांकडून माणसांवर हल्ले होण्याचं प्रमाण जबरदस्त वाढलं आहे. इथे एका सभेसाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले असताना त्यांनी भाषणामध्येही हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या समस्येवर उपायही जाहीर करून टाकला. तुम्ही सगळ्यांनी बजरंगबलीची आरती करा, हनुमान चालीसाचे पठण करा, माकडे तुम्हाला त्रास देणार नाही असं आदित्यनाथ यांनी म्हटलंय.
























































