कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स पदाकरिता नोकरभरती, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे प्रशिक्षण वर्ग

आयबीपीएसतर्फे कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स या पदाकरिता नोकरभरती करण्यात येणार आहे. या नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे या न्याय्य मागणीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाइन-ऑफलाइन प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई,  महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार सदर नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाइन ऑफलाइन प्रशिक्षण वर्ग महासंघातर्फे घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी शिवसेना प्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, पहिला मजला येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215) श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (8369442951) यांच्याशी संपर्क साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

इच्छुक उमेदवारांनी आयबीपीएसच्या संकेतस्थळावर गुरुवार, 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करावयाचा आहे. उमेदवार पदवीधर असावा, उमेदवाराचे वय सर्वसाधारण वर्गाकरिता शासकीय नियमानुसार असेल तसेच आरक्षित प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादेत शासकीय नियमानुसार सवलत/शिथिलता असेल. सदर नोकरभरतीसाठी जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी अर्ज करावेत, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.