
रेल्वेमध्ये 6 हजार 565 पदांची भरती केली जाणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने टेक्निशियन ग्रेड-1 आणि ग्रेड-3 च्या 6565 पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. भरतीसाठी 30 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिपृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वर देण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण देशभरात आहे. उमेदवाराची निवड प्रक्रिया संगणक आधारित चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाईल, असे रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.






















































