
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन शुल्कात कपात केली आहे. आता स्कॅन केलेल्या प्रतीसाठी 700 रुपयांऐवजी केवळ शंभर रुपयेच द्यावे लागतील. प्रत्येक प्रश्नाची पुन्हा तपासणी करण्यासाठी आता 100 रुपयांऐवजी 25 रुपयेच द्यावे लागतील, अशा घोषणा शिक्षण सचिव संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केल्या.






















































