
सामना प्रतिनिधी, मुंबई
तिवरे धरण दुर्घटनेत विस्थापित झालेल्या ग्रामस्थांचे त्यांच्या इच्छेनुसार त्याच गावात पुनर्वसन केले जाईल. ग्रामस्थांची जमीन, शेती सर्व काही इथेच असल्यामुळे गावातच त्वरित पुनर्वसन करणे शक्य होईल. पुनर्वसन करताना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज तिवरे ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना दिले.
रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र कायकर यांनी तिकरे गाकातील उद्ध्कस्त झालेल्या कुटुंबीयांची मंगळकारी पुन्हा भेट घेतली तसेच त्यांच्या पुनर्कसनासाठी ग्रामस्थांबरोबर एक बैठक घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना त्याच ठिकाणी घरे बांधून पुनर्वसन करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, तिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
माळीण गावाच्या धर्तीवर पुनर्वसन करा – शरद पवार
पुणे जिह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावाच्या धर्तीवर रत्नागिरी जिह्यातल्या तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतूनही अनुदान वितरित व्हावे, असे पवार यांनी नमूद केले आहे.
























































