रेखाच्या सिक्युरिटी गार्डला कोरोना

1152

सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या सिक्युरिटी गार्डला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने रेखाचा मुंबईच्या बँड स्टँड येथील बंगला सील केला असून बंगल्याला कंटेंनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. रेखाच्या बंगल्याबाहेर नेहमी दोन सिक्युरिटी गार्ड असतात. यातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर सध्या बीकेसीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर पालिकेने बंगल्याचा संपूर्ण परिसर सॅनिटायझर केला आहे. दरम्यान, बॉलिवूड स्टार्स करण जोहर, बोनी कपूर आणि आमीर खान यांच्या घरात काम करणाNया कामगारांनाही याआधी कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या