सेक्सनंतर प्रेयसीच्या अजब मागणीमुळे प्रियकराची गोची, तज्ञांकडे मागितली मदत

प्रातिनिधिक फोटो

सेक्सनंतर प्रेयसीच्या अजब मागणीमुळे गोची झालेल्या एका तरुणाने रिलेशनशीप पोर्टल ‘एक्स्पर्ट’वर मदतीची मागणी केली आहे. प्रेयसीसोबत गेल्या तीन वर्षापासून संबंधात असून तिची वागणूक चांगली आणि ती हुशार असल्याचे या तरुणाने म्हटले आहे. मात्र तिची एक सवय आमच्यातील वादाचे कारण होत असल्याचे प्रियकराने म्हटले आहे. याबाबत ‘आज तक‘ने वृत्त दिले आहे.

प्रेयसीच्या सर्व सवयी चांगल्या आहेत. मात्र तिला कौतुकासोबत आलोचनाही ऐकण्याची वाईट सवय असल्याचे प्रियकराने म्हटले आहे. जेवण केल्यानंतर, गिफ्ट दिल्यानंतर एवढेच नाही तर सेक्स केल्यानंतरही तिला कौतुकासोबत आलोचना ऐकायची असते.

मला नेहमीच जेवण चांगले झाले आहे, मात्र बटाट्याच्या भाजीला चव नव्हती किंवा तू आज चांगलेच कपडे घातले आहेत मात्र या रंगाची ओढणी त्यावर चांगली दिसत नाही, असे बोलावे लागते. तसेच सेक्सनंतरही तिचे कौतुक आणि आलोचना दोन्हीही ऐकवावे लागते.

प्रेयसीच्या या सवयीमुळे प्रियकराने अशा गोष्टींची एक यादीच बनवली आहे. यात कौतुकासोबत त्याने आलोचनाही लिहिली आहे. तसेच कदाचित प्रेयसीला एखादा मानसिक आजार असावा असे समजून प्रियकराने तिला थेरेपिस्टकडे जाण्याचाही सल्ला दिला. मात्र प्रेयसीने दुर्लक्ष केल्याचे प्रियकराने म्हटले आहे.

बाबो! 23 व्या वर्षी बनली 11 मुलांची आई, 100 मुलांना जन्म देण्याची इच्छा

तरुणाच्या या मागणीवर तज्ञांनीही उत्तर दिले असून प्रेयसीला तिची कौतुकासोबत आलोचना ऐकण्याची सवय चुकीची असल्याचे समजावून सांगणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामुळे प्रियकरावर सतत दबाव येऊन दोघांमधील नात्यासाठी खोट्याचा आधार घ्यावा लागत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

लग्न कोणासोबत करू? चार जणांसोबत पळालेल्या तरुणीला पडला प्रश्न

आपली प्रतिक्रिया द्या