
कोरोनाविरोधातील लढाईसाठी रिलायन्सने पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकले आहे. देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन ‘मिशन व्हॅक्सिन सुरक्षा’ हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत रिलायन्सकडून देशभरातील 10 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यात कर्मचारी वर्ग, सहयोगी, भागीदार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या महिन्यात पार पडली होती. या बैठकीत रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी सर्वसामान्यांचा लसीकरणाचा निर्धार व्यक्त केला होता. त्याअंतर्गत अखेर ‘मिशन व्हॅक्सिन सुरक्षा’ची घोषणा करण्यात आली होती. त्याअंतर्गत रिलायन्सच्या 98 टक्के पात्र लोकांना कोरानावरील लसीचा एक डोस देण्यात आला आहे. यामध्ये कर्मचारी, सहयोगी, भागीदार आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांचा समावेश आहे. फाऊंडेशनने लसीकरणासाठी देशभरात 171 लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत.



























































