भाजपला सत्तेतून हटवणे हीच देशभक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणा या मोदी सरकारच्या इशाऱयावर काम करीत आहेत. भाजपला 2014 आणि 2019मध्ये ऐतिहासिक विजय मिळाला. भाजपला देशाची प्रगती करण्याची संधी होती. परंतु भाजप यात फेल ठरली असून भाजपने देशाचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून हटवणे हीच खरी देशभक्ती ठरणार आहे, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाना साधला.