
पावसाळय़ात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी इमारतींच्या दुरुस्तीकामांना वेग आला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून वडाळा येथे विधानसभेतील प्रभाग क्रमांक 207 मधील इमारतींच्या दुरुस्तीकामांचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबईत पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारच्या वतीने विविध उपाययोजना राबवल्या जात असून मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. इमारतींच्या दुरुस्तीकडेही लक्ष दिले जात असून त्यासाठी लोकप्रतिनिधी आपला निधी उपलब्ध करून देत आहेत. विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांनी उपलब्ध केलेल्या निधीतून आणि माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या प्रयत्नाने वडाळा विधानसभेतील प्रभाग क्र. 207 मधील अव्वल बाग इस्टेट येथील इमारत क्र. 94-सी व 94-डी या इमारतीच्या दुरुस्तीकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार-प्रवक्ता मनीषा कायंदे, विभाग संघटक सुनीता आयरे, विभाग संघटक रचना अग्रवाल, उपशाखाप्रमुख रवी बावकर, उल्हास पांचाळ, शिवसैनिक, युवासैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


























































