पोलादपूर अपघात; १७ मृतदेह बाहेर काढले,बचावकार्य थांबवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पोलादपूर

सहलीसाठी निघालेल्या दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहेत. अंधार पडल्याने बचावकार्य थांबवण्यात आले असून उद्या सकाळी पुन्हा बचावकार्याला सुरुवात होणार आहे.


बचावकार्य सुरू असल्याने पोलादपूर घाटात वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे घाटामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुककोंडी झाली होती. या अपघातात ३३ जण ठार झाले असून संध्याकाळपर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मुसळधार पाऊस आणि बघ्यांच्या गर्दीमुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत होता. रात्री उशीरा बचावकार्य थांबवण्यात आले.

मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत

राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी सकाळी ट्विट करून अपघातग्रस्तांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ४ लाखांची मदत केली.