दखल – नक्षत्रांचा परिपूर्ण अभ्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्षा फडके

अंतराळातील ग्रह, तारे, तारकापुंज, नक्षत्र, राशी, धूमकेतू यांचा अभ्यास प्राचीन काळापासून केलेले आहे. मानवाने अंतराळाचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह, यान सोडले आहेत. चंद्राचा अभ्यास करण्यासाठी तर मानव चंद्रावर पोहोचला आहे. मानवाने अंतराळाचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह, यान सोडले आहे. चंद्राचा अभ्यास करण्यासाठी तर मानव चंद्रावर पाहोचला. मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी मंगळयान गेलेले आहे. विज्ञानाद्वारे या विश्वाची कोडी सोडविण्याचा मानवाचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आहे. मानवाचे कुतूहल, जिज्ञासा, जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नशील सातत्य त्याला निश्चित यशापर्यंत घेऊन जाते.

आपल्यापैकी अनेकांना गच्चीतून आकाश निरीक्षण करायला आवडते. लहानपणी तर आपण हे हमखास केले असेल, पण आपल्यापैकी अनेकांना सप्तर्षी, व्याधतारा, ध्रुवतारा, शुक्राची चांदणी, एका रेषेतील तीन तारे, मंगळ, गुरू इत्यादी ग्रहांची माहिती नसते. शुभकार्य, विवाहकार्यात आपल्यापैकी अनेक जण पंचांग पाहताना चंद्र, नक्षत्राचा आणि नक्षत्र स्वामीचा विचार करतात. मात्र लेखिका श्रीमती उन्हाळे यांनी नक्षत्रचक्राचा अभ्यास करून व नक्षत्राची सर्वांगीण माहिती एकत्र करून ‘नक्षत्र मंडळ’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

ज्योतिष शास्त्रात नक्षत्र विचार हा एक पाया आहे. मुहूर्त शास्त्रात आणि इतर गोष्टीतही नक्षत्रांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. शुभ, अशुभ, क्रूर, विषारी अशा नक्षत्रांच्या अभ्यासांचा फलज्योतिषात विशेष सूक्ष्मता येते. श्रीमती उन्हाळे यांनी या पुस्तकात अत्यंत ओघवत्या भाषेत 27 नक्षत्रांची माहिती दिली असून प्रत्येक नक्षत्राच्या चरणांच्या फलाचा व नक्षत्र गुणधर्माचा उपयोग ज्योतिषाचा अभ्यास करणाऱयांना मार्गदर्शक होणार आहे. नवग्रहांचा अभ्यास आलेले नवग्रहांच्या कक्षेत हे पुस्तक रंजना उन्हाळे यांचे प्रसिद्ध झालेले आहे. ग्रहांच्या बरोबरीनेच नक्षत्रांचे ही तेवढेच महत्त्व असून या नक्षत्रांचा खगोलीय व फलज्योतिषाच्या माध्यमातून सर्वंकष अभ्यास करून अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. खगोलविषयक आणि ज्योतिष अभ्यासक अशा दोघांनाही हे पुस्तक नक्षत्राच्या माहितीसाठी अत्यंत उपयोगी पडणार आहे.

नक्षत्रमंडळ
लेखिका ः रंजना उन्हाळे
प्रकाशक ः सृजनरंग प्रकाशन
मूल्य ः रुपये 40/-