दखल – तरल संवेदनाची अनुभूती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता प्रदीप येंडे

कुणाला शब्द म्हणजे कविता वाटते, पुणाला रचना म्हणजे कविता वाटते तर कुणाला अर्थ म्हणजेच कविता वाटते. कुणाला अनुभव म्हणजे कविता वाटते, पण या साऱयांच्या पलीकडे कविता असते. निराकार परमेश्वरासाखी (मानला तर) ‘बिटवीन द लाइन्स’ असे इंग्रजीत म्हणतात. म्हणजे मराठीत काव्य शब्दांच्या पलीकडे किंवा अलीकडे असते. म्हणजे नेमके काय हे सामान्य वाचकांना कळत नाही. आत्मा जसा निराकार असतो तसेच कवितेचा अर्थही निराकार असतो. त्याला पाऱयासारखे चिमटीत पकडता येत नाही. इतका तो तरल असतो.

कवितेचा आत्मप्रत्यय आत्म्यासारखाच वाचकाला येतो. कविता शब्दांच्या पलीकडला अनुभव असते. म्हणून कविता ‘बिटवीन द लाइन्स’ वाचावी लागते. प्रतिभावान कवी आपला अनुभव प्रतिमांतून साकार करतो. कधी कधी कवितेतील संपूर्ण विधानच प्रतिमा बनून येते.

प्रत्येकाच्या दृष्टिने पाहायला गेलं तर कविता वेगवेगळी भासते. प्रतीक आणि प्रतिमा हा कवितेचा श्वास आहे. तो न हरवता आपल्या भावना योग्य शब्दांत मांडणे सगळ्यांनाच शक्य होत नाही. यासाठी अंतर्मन पारदर्शक आणि तरल हवे आणि अशाच संवेदनशील, तरल, कोमल मन लाभलेल्या कवयित्रीचा काव्यसंग्रह माझ्या वाचनात आला. तो काव्यसंग्रह म्हणजे अर्थात प्रा. सुजाता राऊत लिखित ‘उगमाकडे जाताना’ हा काव्यसंग्रह. संवेदना प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.

कवयित्री प्रा. सुजाता राऊत या वाणिज्य शाखेच्या शिक्षिका असल्या तरी साहित्याची आवड त्यांना लहानपणापासून आहे. त्यांच्यावर वाचनाचे संस्कार तेव्हाच झाले. त्यामुळे क्षेत्र वेगळं असलं तरी त्यांचं मन कवितेत रमतं हे या पुस्तकात पदोपदी जाणवते. म्हणतात ना, माणसाने एखादा छंद जोपासावा, एखादी कला आत्मसात करावी. कारण कला ही जगायला शिकवते आणि कविता ही कवयित्रीचा श्वास आहे हे काव्यसंग्रह वाचताना जाणवते.

‘उगमाकडे जाताना’ या काव्यसंग्रहाचे शीर्षक किती बोलके आहे पहा…कवयित्री प्रा. सुजाता राऊत या आपल्या भावना व्यक्त करताना प्रत्येक गोष्टीचा अगदी खोलवर जाऊन विचार करतात. मुळाशी जाऊन ती गोष्ट जास्तीत जास्त विस्तृतपणे माडण्याचा त्या प्रयत्न करतात. सकारात्मकतेकडे वाटचाल करणारा हा काव्यसंग्रह आहे.

काही कविता या कवयित्रीचे हळव्या मनाचे दर्शन घडवतात तर काही कविता समजूतदारपणाने व्यक्त होतात. संग्रहातील कविता वाचताना हा प्रा. सुजाता राऊत यांचा पहिलाच संग्रह आहे असे पुठेही जाणवत नाही. इतक्या त्यांच्या कविता प्रगल्भ, स्वतंत्र आणि प्रामाणिक भावनेत मुरलेल्या आहेत.

एका अश्रूचं
वय तरी काय असतं?

कवयित्री अश्रूच्या एका थेंबाचा किती आपलेपणाने विचार करते. ‘मी, माझं’ असा विचार करणाऱया या जगात डोळ्यांतून ओघळणाऱया अश्रूच्या वयाचा विचार करणाऱया कवयित्रीच्या कोमल आणि तरल मनाचं दर्शन या कवितेत घडतं.

अटळ असते
काही माणसांचे आयुष्यात येणे,
अटळ असते
त्यांचे निघून जाणे…

‘अटळ असते’ या कवितेतून कवयित्रीने जीवनाची कटू, पण सत्य परिस्थिती मांडली आहे. हे सत्य स्वीकारून माणसाने आयुष्य जगायला हवे हेच कवयित्री सांगते आहे.
‘तटबंदी’, ‘बाईला आवडतं’, ‘ती’, ‘बाईपण’ या कवितांमधून स्त्र्ााr-अस्तित्व, स्त्र्ायांचं विश्व कवयित्रीने आपल्या शब्दांत रेखाटले आहे. ‘काही नाती’, ‘नातं तुटताना’, ‘नात्यात खोल बुडताना’ या कविता नात्यांचं महत्त्व, नात्यांची ओढ, नातं कसं जपलं पाहिजे, हे सांगतात. ‘काही कविता’, ‘कविता रचताना’, ‘न केलेल्या कविता’ या कवितांमधून कवयित्रीचे आणि कवितेचे नाते कसे दृढ होत गेले, तोच प्रवास या कवितांमधून अधोरेखित झाला आहे.

‘उगमाकडे जाताना’ या काव्यसंग्रहाला डॉ. अनुपमा उजगरे यांनी मौलिक प्रस्तावना लिहिली आहे. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्र कवी, लेखक, चित्रकार रामदास खरे यांनी रेखाटले आहे. कवयित्री प्रा. सुजाता राऊत यांची उगमाकडे जाणारी कविता नक्कीच वाचकांना भुरळ पाडेल.

उगमाकडे जाताना
कवयित्री ः प्रा. सुजाता राऊत
प्रकाशक ः संवेदना प्रकाशन
मूल्य ः रुपये 125/-