
राज्य सरकारने आदिवासीबहुल नाशिक, धुळे, नंदुरबारसह आठ जिह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदुनामावली निश्चित केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आरक्षण उपसमितीने याबाबत केलेल्या शिफारशीनंतर ही बिंदुनामावली निश्चित करण्यात आली.
नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर या प्रत्येक जिह्यात अनुसूचित जातींसाठी 10 टक्के, अनुसूचित जमातींसाठी 22 टक्के, विमुक्त जाती (अ) साठी 3 टक्के, भटक्या जमाती (ब) साठी 2.5 टक्के, भटक्या जमाती (क) साठी 3.5 टक्के, भटक्या जमाती (ड) साठी 2 टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के, इतर मागास वर्गासाठी 15 टक्के, एसईबीसीसाठी 8 टक्के, ईडब्ल्यूएससाठी 8 टक्के आणि खुला प्रवर्गासाठी 24 टक्के आरक्षण निश्चित केले आहे.
रायगड जिह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 12 टक्के, अनुसूचित जमातींसाठी 9 टक्के, विमुक्त जाती (अ) साठी 3 टक्के, भटक्या जमाती (ब) साठी 2.5 टक्के, भटक्या जमाती (क) साठी 3.5 टक्के, भटक्या जमाती (ड) साठी 2 टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के, इतर मागास वर्गासाठी 19 टक्के, एसईबीसीसाठी 10 टक्के, ईडब्ल्यूएससाठी 9 टक्के आणि खुला प्रवर्गासाठी 28 टक्के आरक्षण ठेवले आहे.