जीपच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीपने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुशीलकुमार यादव असे रिक्षाचालकाचे नाव आहे. अपघातप्रकरणी हातिम मलमपट्टीवाला या व्यावसायिकाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

सोमवारी सकाळी सुशील हा वांद्रे 30 वा रोड येथे आला होता. तेव्हा त्याला भरधाव जाणाऱ्या जीपने धडक दिली. त्या धडकेत सुशील हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच वांद्रे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी सुशीलला रुग्णालयात नेले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातप्रकरणी पोलिसांनी जीपचालकाविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तपास करून हातिमला अटक केली. हातिम हा सुरत येथील व्यावसायिक असून तो एका खासगी पंपनीचा संचालक आहे.