पंतचे करावे तरी काय? लक्ष्मणने दाखवला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ मार्ग

736

विश्वचषकाच्या सुरुवातीपासून टीम इंडियामध्ये चौथ्या स्थानावर कोण खेळणार हा पेच सुरू झाला होता. विश्वचषकाला आता दोन महिन्यांचा काळ होत आला तरीही तो कायम आहे. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या स्थानावर यष्टीरक्षक फलंदाज पंतला मैदानात उतरवण्यात आले. परंतु त्याचा खराब खेळ येथेही सुरुच आहे. त्यामुळे पंतला चौथ्या स्थानावर खेळवू नका असा सल्ला टीम इंडियाचा माजी खेळाडू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने दिला आहे.

चौथ्या क्रमांकावर खेळायला उतरले दोन फलंदाज, टीम इंडियातील गोंधळ उघड

आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेतही पंत आपली छाप सोडू शकला नाही. पहिला सामना पावसाने वाहून गेल्यानंतर दुसऱ्या लढतीत पंतला चौथ्या स्थानावर संधी मिळाली. या लढतीत तो फक्त 4 धावा करू शकला, तर दुसऱ्या लढतीत त्याने 19 धावांची छोटी खेळी केली. त्यामुळे त्याचे संघातील स्थानही आता धोक्यात आले आहे. पंतच्या कामगिरीचा सामन्याच्या निर्णयावरही परिणाम होत आहे.

यावर लक्ष्मणनं एक मार्ग सुचवला आहे. ‘पंत हा आक्रमक खेळणारा फलंदाज आहे. पण, चौथ्या स्थानावर नेमकी कशी फलंदाजी करायची असते याचा अंदाज त्याला नाही. त्यामुळे त्याला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवायला हवे. तिथे नैसर्गिक खेळ करून स्वत:ला सिद्ध करायची त्याला संधी मिळेल,’ असे लक्ष्मणने म्हटले आहे.

शास्त्रीही नाराज
संघामध्ये बऱ्याचवेळा संधी देऊनही धसमुसळेपणाने विकेट फेकणाऱ्या पंतवर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे देखील नाराज आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्याला निट खेळ अन्यथा फटके देईल इतपत सुनावल्याचे म्हटले. त्यामुळे त्याच्या फलंदाजीची आणि संघातील स्थानाची चर्चा ऐरणीवर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या