गंगाखेडमध्ये दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू

371
accident

12 वीच्या परीक्षेचा आजचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर देऊन गावाकडे सायकलने परतत असताना पाठीमागुन येणाऱ्या मोटरसायकलने धडक दिल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना लेंडेवाडी शिवारात घडली. पालम तालुक्यातील चोरवड येथील जय भवानी महाविद्यालयातून 12 वीचा पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर देऊन गावाकडे सायकलने परतत असताना मारोती रामकिशन साबने ( व.17) या विद्यार्थ्याच्या सायकलला मोटसायकने धडक दिली. त्यात विद्यार्थ्याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्याचा जागीच मुत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या