
अहमदपूर – अंबाजोगाई महामार्गाचे काम सुरू असून पाटोदा गावाजवळ पुलाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे कच्चा रस्ता तयार करून वाहतूक सुरू होती. अचानक आलेल्या पावसाने हा रस्ता वाहून गेला. अहमदपूर-अंबाजोगाई महामार्गावरील पाटोदा गावाजवळ रस्त्याचे काम चालू आहे. पूल उभारणीचे काम अपुर्ण असल्यामुळे येथे तात्पुरत्या स्वरूपाचे मुरुम, दगड टाकून पूलाच्या बाजुने रस्ता बनवून वाहतूक सुरू होती. हा रस्ता अचानक दुपारी पावसाने आलेल्या पुरात वाहून गेला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचे काम चालू होते.





























































