
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर यूट्यूबर लीला साहूची चर्चा आहे. मध्य प्रदेशच्या सिधी जिह्यातल्या छोट्या गावात राहणारी लीला अनेक दिवसांपासून गावातील रस्त्यासाठी भांडत आहे. तिच्या लढ्याला आता यश आले असून रस्त्याचे काम सुरू झाले आहे. भाजप खासदार डॉ. राजेश मिश्रा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिच्या मुद्द्यांना व्यापक समर्थन मिळू लागले होते.