
चारचाकी गाडी अडवून खिडकीतून मोबाईल, रोख रक्कम व गाडीची चावी हिसकावून पसार झालेल्याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री फुलेनगर भागात ही घटना घडली होती. राहुल रामचंद्र अडागळे (26,रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत मनोज कुराडे (वय 36,रा. विश्रांतवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
फुलेनगर भागात शुक्रवारी रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार चारचाकी गाडीतून जात होते. त्यावेळी आरोपी अडागळे गाडीसमोर आडवा आला. त्यामूळे कुराडे यांनी तात्काळ ब्रेक दाबून गाडी थांबविली. यावेळी अडागळे याने गाडीच्या खिडकीतून हात घालून मोबाईल व गाडीची चावी हिसकावली होती. त्यानंतर अडागळे पसार झाला. विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ तपास करीत अडागळे याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करीत आहेत.



























































