पिस्तुलाच्या धाकाने पिंपरखेडच्या महाराष्ट्र बँकेवर दरोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर भरदिवसा रिव्हॉल्व्हरच्या धाकाने पाच दरोडेखोरांनी तब्बल 2 कोटी 31 लाख रुपयांचा दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बँक अधिकारी व कर्मचाऱयांना मारहाण देखील केली. ही घटना दुपारी दीड वाजता घडली.

पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत तोंडाला कापड बांधलेले पाच दरोडेखोर बँकेत घुसले आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कर्मचाऱयांना मारहाण करु लागले. त्यानंतर अधिकाऱयांकडून लॉकरच्या चाव्या घेतल्या. लॉकर उघडून त्यातील तब्बल 2 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व 31 लाख रुपयांची रोकड पोत्यात भरली आणि बँकेबाहेर येत सफेद रंगाच्या मोटारीने गावातून वेगाने पसार झाले.