रोबोट म्हणतोय मास्क घाला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे माणसाची जीवनशैली बदलली आहे. मॉल, मल्टीप्लेक्स असो वा एखादं कार्यालय… प्रवेशद्वारावर उभी असलेली व्यक्ती आपल्या शरीराच्या तापमानाची नोंद करते, सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सूचना देते तसेच मास्क घातला नसेल तर त्याची आठवण करून दिली जाते. भविष्यात हीच कामे एखाद्या रोबोटने केली तर… वाचून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरंय. ही कल्पना धाराशीवच्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सत्यात उतरवली आहे. त्यांनी तयार केलेला मिस मास्की हा रोबोट नागरिकांना कोरोनाच्या नियमांची आठवण करून देणार आहे.

कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी धाराशीवच्या विद्यार्थ्यांचे हायटेक पाऊल तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून हा रोबोट तयार केला आहे. विद्यार्थ्यांचे काwतुक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, सद्यपरिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा रोबोट आमच्या विद्यार्थ्यांनी बनविला आहे. हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱया प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. व्यक्तीने मास्क घातला की नाही हे तपासून तत्काळ सूचना करतो. व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाची नोंदसुद्धा आपल्याला दाखवतो. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळू शकतो. विशेष म्हणजे हा रोबोट येणाऱया प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देतो आणि प्रत्येकाचे स्वागतसुद्धा करतो. अल्प किमतीत विद्यार्थ्यांनी या रोबोटची निर्मिती केली आहे.

नुकताच हा रोबोट कार्यान्वित करण्यात आला. या वेळी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख प्रा. एस. जी. शिंदे, प्रोजेक्ट समन्वयक प्रा. श्रीकांत अघोर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, व्ही. डी. पवार, प्रकाश महाजन यांची उपस्थिती होती.

सार्वजनिक ठिकाणी ठरणार उपयुक्त

सध्या नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी आणि मास्क घातलाय आहे की नाही हे पाहण्यासाठी विविध कार्यालयांबाहेर एखादी व्यक्ती उभी करावी लागते. हे कार्य करताना त्या व्यक्तीलाही इतरांपासून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच रोबोटचा पर्याय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिला आहे. या प्रोजेक्टमुळे विद्यार्थ्यांनी हे सिद्ध केले की, ग्रामीण भागातसुद्धा महाविद्यालयाने वेळोवेळी चांगली संधी देऊन त्यांच्यातील काwशल्यास वाव दिलेला आहे.