
मुंबईत पवईतील रा स्टुडिओत १७ मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. मुलांना वाचवत असताना आरोपी रोहित आर्य याने पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी रोहित आर्य याच्या छातीत डाव्या बाजूला गोळी लागली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे.
पोलिसांच्या गोळीबारात आरोपी रोहित आर्य हा जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळावरून एक एअरगन आणि केमिकलही पोलिसांनी जप्त केले होते. आरोपी एकटाच होता. आम्ही आरोपीशी बातचीत केली. आणि मुलांना ओलीस का ठेवलं? याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी आपल्या मागण्यांवर अडून होता. त्यामुळे हे प्रकरण मिटू शकलं नाही, अशी माहिती पोलिसांनी घटनास्थळावर माध्यमांना दिली आरोपीच्या मृत्यूपूर्वी दिली होती.




























































