आम्हाला प्रायव्हसी आहे का नाही? वाढत्या हस्तक्षेपावरून रोहित शर्मा भडकला

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमुळे मुंबईचा संघ बाहेर फेकला गेला. यंदाच्या हंगमात मुंबईच्या संघाला विशेष करून कर्णधार हार्दिक पंड्याला टीकेचा सामना करावा लागला आहे. विविध कारणांमुळे मुंबईचा संघ या हंगामात चर्चेचा विषय ठरला. तसेच समाज माध्यमांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे खेळाडूंना सुद्धा मनस्तापाचा सामना करावा लागला. असाच काहीसा प्रकार मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या बाबतीत घडला असून त्याबद्दल आपल्या संतप्त भावना त्याने सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

रोहित शर्माने ‘X’ या सोशल मीडिया माध्यामावर ट्वीट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. “क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्यामध्ये इतका हस्तक्षेप झाला आहे की कॅमेरे आता त्यांचे प्रत्येक पाऊल आणि संभाषण किंवा सराव सत्र किंवा सामन्यांदरम्यान त्यांच्या मित्र आणि सहकारी खेळाडूंशी वैयक्तिक संभाषण रेकॉर्ड करू लागले आहेत,” असे म्हणत रोहितने समाज माध्यमांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

MS Dhoni Handshake: ‘सेलिब्रेशन्स’मुळे धोनीनं हँडशेक टाळलं? RCB खेळाडूंच्या वर्तनावर तज्ज्ञांची नाराजी

“मी स्टार स्पोर्ट्सला माझे संभाषण रेकॉर्ड करू नये असे सांगितले होते. मात्र त्यांनी ते रेकॉर्ड केले आणि प्रसारित सुद्धा केले. हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. विशेष कंटेट, व्यूज आणि तात्काळ प्रसारित करण्यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे एक दिवस चाहत्यांच्या, क्रिकेटपटूंच्या आणि क्रिकेटच्या विश्वासाला तडा जाईल. थोडे समजूतीने काम करा. तसेच तुमच्या आकलनाची व्याप्ती वाढवा,” असे म्हणत रोहित शर्माने स्टार स्पोर्टसह इतर माध्यमांना खडे बोल सुनावले आहेत.