रोहित शर्मा तिसऱ्य़ा कसोटीत खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा सिडनी येथे सात जानेवारीपासून खेळवण्यात येणाऱ्य़ा तिसऱ्य़ा कसोटीत खेळणार हे शुक्रवारी निश्चित झाले आहे. रोहित शर्मा याची हिंदुस्थानच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता तो तिसऱ्य़ा कसोटीत खेळणार की नाही याबाबत शंकाकुशंकाना  पूर्णविराम मिळाला आहे.

रोहित शर्मा याने क्कारंटीन कालावधी पूर्ण केल्यानंतर गुरुवारी टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत सराव केला. त्यानंतर बीसीसीआयकडून चेतेश्वर पुजाराऐवजी रोहित शर्माला उपकर्णधारपदी पसंती देण्यात आली.

रोहित शर्माच्या समावेशामुळे मात्र सलामीवीर मयांक अग्रवाल व मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला डच्चू मिळणार हेही पक्के झाले आहे.