मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत 15 ठराव, 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने जरी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी आम्ही गप्प बसणार नाही. मराठा आरक्षण मिळवणारच, असा निर्धार आज येथे झालेल्या मराठा संघटनांच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत करण्यात आला. दरम्यान, सरकारकडे मागणी केलेल्या प्रमुख नऊ मागण्यांची पंधरा दिवसांत पूर्तता न झाल्यास आणि आरक्षणप्रश्नी तोडगा न काढल्यास 10 ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता ‘महाराष्ट्र बंद’ करण्याचा इशाराही देण्यात आला. तत्पूर्वी परिषदेत 15 ठराव मंजूर करण्यात आले.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर समाजातील तरुण-तरुणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर न्यायासाठी ठिकठिाकणी ठिय्या आंदोलने केल्यानंतर आज दुपारी येथे राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील अनेक मराठा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपाqस्थत होते. यावेळी सुरेश पाटील, विजयिंसग महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 • बैठकीतील ठराव
 • सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारर्ची.
 • विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातील फीचा परतावा शासनाने द्यावा.
 • आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा.
 • मेगा भरतीला स्थगिती द्यार्वी.
 • सारथीसाठी 1000 कोटींची तरतूर्द.
 • अण्णासाहेब पाटील महामंडळाला 1000 कोटींची तरतूद.
 • जिल्ह्यांत मुलामुलींसाठी वसतिगृह.
 • आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.
 • आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी.
 • शेतकरी कर्जमुक्त करावा.
 • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्य़ांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
 • स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी.
 • अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
 • कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी.
 • राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 500 कोटींची तरतूद करावी.

परिषदेत मराठा समाजाला नोकरीत 13 टक्के, शिक्षणात 12 टक्के आरक्षण, मेगा नोकर भरती, शैक्षणिक फीमध्ये सवलत या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींनी मराठा आरक्षणाची भूमिका मांडली.mar

आपली प्रतिक्रिया द्या