
कंपनीचे सर्व्हर हॅक करून सायबर चोरट्यांनी दीड कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना नवले ब्रीज परिसरातील देवदूत डिजीटल पेमेंट अॅण्ड ई-सव्र्हिसेस कंपनीच्या कार्यालयात घडली आहे.
याप्रकरणी विश्वास साळुंखे (43) रा. वडगाव बुद्रुक यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नवले ब्रीज परिसरात विश्वास साळुंखे यांचे देवदूत डिजीटल पेमेंट अॅण्ड ई-सर्विसेस कार्यालय आहे. एप्रिल ते जुलै 2020 मध्ये चोरट्यांनी संबंधित कंपनीचा सर्व्हर हॅक केला.
त्यानंतर दीड कोटी रुपये ऑनलाईन वर्ग करून घेतले. त्यानंतर व्यवहाराची माहिती कंपनीच्या सर्व्हरवरून डिलीट करून टाकली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे तपास करीत आहेत.
























































