
मुंबईतील वरळी भागात दोन आलिशान ड्युप्लेक्स फ्लॅटसाठी तब्बल 639 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. फार्मा कंपनी यूएसव्हीच्या अध्यक्षा लीना तिवारी यांनी हे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. ही देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी रेसिडेंशियल प्रॉपर्टी डील आहे. या फ्लॅटसाठी प्रति स्क्वेअर फुटासाठी 2.83 लाख रुपये मोजण्यात आले आहेत. यात एकूण 22,572 स्क्वेअर फुटांचे हे फ्लॅट आहेत. हे फ्लॅट 40 मजल्यांच्या इमारतीत 32 आणि 35 व्या मजल्यावर आहेत. ही इमारत वरळी सी फेस समुद्राच्या एकदम समोर आहे. लीना तिवारी यांनी या फ्लॅटच्या नोंदणीसाठी 63.9 कोटी रुपयांहून जास्त स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी मोजले आहेत. हा सर्व खर्च मिळून या दोन फ्लॅटसाठी एकूण 703 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.