
सामना ऑनलाईन । कोलकाता
निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस संघाची मदत घेत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच काँग्रेस, भाजप आणि डाव्यांच्या घातक युतीला हरवा असे आवाहनी त्यांनी यावेळी केले. बहरामपुरच्या एका सभेत त्या बोलत होत्या.
RSS helping Congress in Murshidabad: Mamata Banerjee at Bhagabangola
মুর্শিদাবাদে কংগ্রেসের হয়ে কাজ করছে আরএসএস: ভগবানগোলায় মমতা বন্দ্যোপাধ্যায়
Read More >> https://t.co/naWOVcvKGB pic.twitter.com/C6hcrVRPsm
— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 15, 2019
मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, प्रणब मुखर्जी यांनी 2018 मध्ये नागपुरमध्ये संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आता संघ मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांचा प्रचार करत आहेत.” तसेच काँग्रेस, डावे, भाजप यांच्या छुप्या युतीला बंगाली मतदार योग्य उत्तर देईल व तृणमूक काँग्रेस राज्याच्या सर्व 42 जागा जिंकेल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावर पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा म्हणाले की, राज्यात संघाचा विस्तार ममता बॅनर्जी यांच्यामुळेच झाला आहे. तसेच संघ काँग्रेसची मदत करत नसून संघ तृणमूलचा बचाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.



























































