सरसंघचालक मोहन भागवत अंबाजोगाईत येणार

1376
mohan-bhagwat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत येत्या 30 डिसेंबर रोजी अंबाजोगाईत येणार आहेत. इतिहास संशोधक प्रा. डॉ. शरद हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती महोत्सव समितीचे समन्वयक प्रसाद चिक्षे यांनी दिली आहे. 2 दिवसाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तत्कालीन समवयस्क संघ प्रचारक यांच्यासाठी शांती यज्ञ केला जाणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

डॉ. शरदरावजी हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या वतीने 29 आणि 30 डिसेंबर रोजी अमृत महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. डॉ. हेबाळकर हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्यवाह आणि खोलेश्र्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहिलेले आहेत. संघ प्रणित इतिहास संकलन समितीचे ते केंद्रिय सदस्य पण आहेत. हिंदु संस्कृतीच्या प्रसार आणि जनजागृतीसाठी त्यांनी जगाच्या पाठीवर देश आणि परदेशात भ्रमण करून ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा जतन करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार फार मोठा आहे. हेबाळकर कुटुंबियांचे संपूर्ण आयुष्य राष्ट्रभक्ती प्रेरित असुन समाजोन्नतीच्या मार्गावर जाताना समर्पित भावनेतून जीवन जगणारे हे लोकांनी पाहिलेलं आहे. संघ कार्यासाठी त्यांचे योगदान अवर्णनीय आहे. इतिहास संशोधनात त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

संघ कार्यात सक्रिय असताना तत्कालीन काळात समवयस्कर म्हणून ज्या लोकांनी योगदान दिले अशा तीस संघ प्रचारकासाठी शांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले असुन प.पु. यज्ञेश्र्वर शास्त्री सेलुकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 29 रोजी कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय सेविका समितीच्या संचालिका श्रीमती शांताक्का यांची उपस्थिती विशेष असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाची सांगता 30 डिसेंबर सायंकाळी 4 वाजता होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या