मुंबईत रुद्रवीणेचा संगम

546

‘अनाम प्रेम’ संस्थेने 26 जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठात ‘रुद्रवीणा संगम’ हा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे. देशातील ख्यातनाम रुद्रवीणावादक या वेळी आपली कला सादर करतील. मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियममध्ये सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार असून तो विनामूल्य आहे.

रुद्रवीणा हे हिंदुस्थानी संगीत परंपरेतील सर्वात पुरातन वाद्य मानले जाते. रामायण आणि महाभारतातही रुद्रवीणेचे संदर्भ आढळतात. त्या वेळच्या युद्धशास्त्रात रुद्रवीणाला खूप महत्त्व होते, पण त्यानंतर हे वाद्य काहीसे मागे पडले. आता तरुण पिढीत या वाद्याबद्दल उत्सुकता दिसत असून रुद्रवीणा शिकणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिनी दिवसभर ‘रुद्रवीणा संगम’ हा कार्यक्रम अनाम प्रेम परिवार आणि मुंबई विद्यापीठचा बहिःशाल शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे.

उस्ताद मोही बहाउद्दीन डागर, पंडिता ज्योती हेगडे, पंडित सुवीर मिश्र आणि उस्ताद झाहिद खान, फरीदी देसाई हे ख्यातनाम कलाकार या कार्यक्रमात रुद्रवीणा कलाविष्कार सादर करतील. उस्ताद मोही बहाउद्दीन डागर हे धुपद शैलीत वादन करत असून या परंपरेचा उगम सामवेदात आहे, तर उस्ताद झाहिद खान, फरीदी देसाई हे गौहरबानी घराण्याची परंपरा चालवणारे कलावंत आहेत. पंडिता ज्योती हेगडे या रुद्रवीणा वाजवणाऱ्या पहिल्या महिला कलावंत आहेत. पंडित सुवीर मिश्र हे डाव्या हाताने रुद्रवीणा वाजवणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी आहेत. नावनोंदणीसाठी संपर्क – 9769449828.

आपली प्रतिक्रिया द्या