श्री रुक्मिणी सहकारी बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांनी घातला कर्जदारास 70 लाख रुपयांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीगोंदा तालुक्यातील श्री रुक्मिणी सहकारी बँकेच्या शाखा पाईपलाईन, नगर या बँकेचे चेअरमन व बँक व्यवस्थापक यांनी संगनमत करून भगवान कांतीलाल फुलारी मौजे भेंडा बुद्रुक (ता. नेवासा) येथील, व्यावसायिकास कर्ज प्रकरणातून सुमारे 70 लाखांची फसवणूक स्वामी समर्थ इंजिनिअरिंग व नाना ज्ञानदेव आघाव रा. भानगाव (ता. श्रीगोंदा) केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्री रुक्मिणी सहकारी बँकेची पाईपलाईन अहमदनगर येथे शाखा असून या शाखेमध्ये भगवान कांतीलाल फुलारी यांनी गायत्री पल्सेस मिल या नावाने पूर्वीचे सुमारे 33 लाख रुपयांचे कर्ज होते. नवीन कर्ज प्रकरण करण्यासाठी 2 मार्च रोजी भेंडे बुद्रुक. ता. नेवासा येथील बिनशेती गट नं 54/1 मधील क्षेत्र 0.45 आर व गायकवाड जळगाव तालुका गेवराई येथील गट नं 133 चे क्षेत्र 1 हेक्टर 60 आर तारण म्हणून बँकेस दिले. त्यासोबत नगर येथील ॲक्सिस बँक शाखेचे स्वतःचे 10 चेक व पत्नी गायत्री फुलारी यांचे 10 चेक रक्कम न टाकता असे 20 चेक सही करून दिले होते. तसेच व्हेंन्डॅर कंपनी उमापूर तालुका गेवराई यांचे 70 लाखांची बिले तर जामीनदार आप्पासाहेब चांगदेव दिघे पंचगंगा वीट उत्पादक यांचे यांचे व्हेंन्डॅर म्हणून 20 लाखांची बिले दिली होती. त्यानंतर तुमचे कर्ज प्रकरण एक महिन्यात मंजूर होईल असे सांगितले.

परंतु सुमारे तीन महिने उलटून गेल्यानंतर मी श्रीगोंदा येथील मुख्य शाखेत वारंवार हेलपाटे मारूनही माझे दिलेले कागदपत्र बँकेचे चेअरमन वसंत विठ्ठल गुंड व व्यवस्थापक अशोक मडके यांना मागणी केली. परंतु त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर मी पोलिसात जाईन असे सांगून निघून आलो त्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रे दिनांक 9 मे रोजी ईमेल द्वारे पाठवली. सदर कागदपत्रे पाहून मला धक्काच बसला कारण माझ्या कर्ज खात्यावर असणारे सुमारे 59 लाख 73 हजार 358 रुपये कर्ज प्रकरणाला सिक्युरिटीसाठी दिलेल्या ॲक्सिस बँकेच्या चेकद्वारे माझ्या परस्पर काढल्याचे समजले. या बाबत चौकशी केली असता श्री स्वामी समर्थ इंजिनिअरिंग या नावाने दोन चेकद्वारे 19 लाख 24 हजार तर नाना ज्ञानदेव आघाव रा. भानगाव (ता.श्रीगोंदा) यांच्या नावाने 6 चेक द्वारे सुमारे सुमारे 50 लाख 49 हजार 358 रुपये असे मिळून असे मिळून 69 लाख 73 हजार 358 रुपये काढले. त्यांच्या नावावर असणारे पूर्वीचे 33 लाख रुपयांचे कर्ज खाते नील न करता तारण दिलेल्या क्षेत्रावरती बोजा चढवला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक नगर यांच्याकडे उपोषण करूनही अद्याप पर्यंत चार दिवस उलटूनही कुठलीही दखल घेतली नाही. तरी श्री. रुक्मिणी सहकारी बँकेची चौकशी करून बँकेचे चेअरमन व व्यवस्थापक यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी भगवान फुलारी यांनी केली.