ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे

577

ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे असून अमरावती विभागातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. अमरावती पाठोपाठ नाशिक आणि पुणे विभागात सर्वाधिक नोंदणी झाली असून मुंबईतील विद्यार्थ्यांनी आयटीआयला सर्वात कमी प्रतिसाद दिला आहे.

राज्यातील शासकीय आणि खाजगी 986 आयटीआय संस्थांमध्ये असलेल्या 1 लाख 45 हजार 828 जागांसाठी 1 ऑगस्टपासून प्रवेशाची नोंदणी सुरू झाली आहे. आठवडाभरात तब्बल 84 हजार 966 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 62 हजार 259 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. तर 45 हजार 39 विद्यार्थ्यांनी फीदेखील भरली आहे. तसेच 28 हजार 746 विद्यार्थ्यांनी विकल्प सादर केले आहेत. सात दिवसांमध्ये अमरावती विभागातून सर्वाधिक 11 हजार 810 विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले. त्याचप्रमाणे फी भरल्यानंतर अमरावती विभागातून सर्वाधिक 5752 विद्यार्थ्यांनी विकल्प सादर केले आहेत.

आयटीआयसारख्या कौशल्याधारित अभ्यासक्रमाकडे मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचा ओढा यंदा कमी असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विभागातून सर्वाधिक कमी 6 हजार 912 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. त्यातील फक्त 2 हजार 912 विद्यार्थ्यांनी फीसह विकल्प अर्ज भरले आहेत.

विभागनिहाय विद्यार्थी संख्या
अर्ज भरले     फी भरली      विकल्प भरले
अमरावती    11810       8475           5752
नाशिक        11523      8401           5180
पुणे            11120      8357           5478
औरंगाबाद     11111      7898           4883
नागपूर           9783     6983           4541
मुंबई             6912      4925          2912
एकूण          62259    45039         28746

आपली प्रतिक्रिया द्या