चला श्रीगणेशा करूया, रशियन राजदूतांनी अमेरिकेला डिवचले

चला श्रीगणेशा करुया, अशा शब्दांत रशियाचे राजदूत बाबुश्किन यांनी आज पत्रकार परिषदेची सुरुवात करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दिल्लीतील रशियन दुतावासात बोलताना त्यांनी अमेरिकेवर टीका केली. हिंदुस्थान हा रशियाचा घनिष्ठ मित्र असल्याचे म्हटले. हा व्हिडीयो तुफान व्हायरल होत आहे. हिंदुस्थानच्या डोमसाठी रशिया मदत करत राहाणार का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता बाबुश्किन म्हणाले तुम्हाला सुदर्शनचक्र म्हणायचे आहे का? असा उलटप्रश्न करत पुढच्या वेळी मला हिंदीत प्रश्न विचारा, मी त्याचे चांगले उत्तर देईन, असे ते म्हणाले.