तीन पक्षांचा पाठिंबा असल्याने ऋतुजा लटके यांचाच विजय होणार – वळसे पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऋतुजा लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचा पाठिंबा आहे. तसंच राज्यात गेले काही दिवस सुरू असलेलं राजकारण जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे जनताच या सगळ्याला योग्य ते उत्तर देईल. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके याच विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवारी ऋतुजा यांनी या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऋतुजा यांना पाठिंबा देण्यासाठी स्वत: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आले होते. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत विजय हा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा होईल, असा दावा वळसे पाटील यांनी केला आहे.