
सामना प्रतिनिधी, मुंबई
मराठी साहित्य संमेलन म्हणजे 2000 वर्षे आऊटडेटेड, खर्चिक, टाइमपास कार्यक्रम अशी टीका दिग्दर्शक सचिन कुंडलकर यानी केली आहे. यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड होताच सचिन कुंडलकर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
‘मराठी साहित्य संमेलनासारख्या 2000 वर्षे आउटडेटेड आणि खर्चिक, टाइमपास कार्यक्रमाला परिचयाची किंवा परिसरातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून आली की केस काळे करावेत, दारू सोडावी, व्यायाम सुरू करावा, दर सहा महिन्यांनी तपासण्या करून घ्याव्यात. आपले वय वाढले असल्याचे भयंकर लक्षण. कारण अशा ठिकाणी आपल्यापेक्षा 190 वर्षे मोठी आणि कधीच नावे न ऐकलेली माणसे पाहायची सवय होती, अशी पोस्ट कुंडलकर यांनी फेसबुकवर लिहिली आहे.
कुंडलकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर विजू मामा नावाने शोक व्यक्त करणाऱ्यांना फटकारले होते. त्यांच्या त्या पोस्टवर अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती.
summary- sachin kundalkar controversial post on literature festival



























































